info@jobshowcase.in
"

EGC (Employment Guidance Center)

  • तुमच्या ऑफीस मध्ये Job Showcase कंपनीने दिलेला EGC (Employment Guidance Centre) चा फलक लावावा. आणि संपूर्ण भागामध्ये अनुक्रमे EGC (Employment Guidance Centre) चालू केल्याची प्रसिद्धी करावी.
  • ज्या बेरोजगारांना नोकरी पाहिजे अश्यांचा बायोडाटा ऑफिसला जमा करून घ्यावा.
  • जमा केलेला बायोडाटा Job Showcase कंपनीच्या अधिकृत वेबसाईट (www.jobshowcase.in) किंवा Job Showcase App वरती अपलोड करावा किंवा resume@jobshowcase.in या ई-मेल वर पाठवावा किंवा Job Showcase च्या फोन न. वर Whats APP करावा.
  • त्यानंतर Job Showcase चे प्रतिनिधी बायोडाटा भेटल्याच्या दुसऱ्या दिवशी त्या उमेदवारांना तुमच्या नावावरून फोन च्या माध्यमातून बोलतील ( तुमच्या ऑफीसमधून बोलतोय असे उमेदवारांना सांगतील, म्हणजेच Job Showcase चे ऑफीस तुमचे नोकरी मार्गदर्शन विषयक अधिकृत ऑफीस असेल) किंवा उमेदवारांना SMS/email करतील व त्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीविषयी अधिकची माहिती देऊन (कंपनीचे नाव, कामाचे स्वरूप, ठिकाण, पेमेंट इ.) विशिष्ट कंपनीमध्ये मुलाखत देण्यास सांगतील.
  • उमेदवार मुलाखतीमध्ये पात्र झाल्यानंतर त्यांच्या पुढील प्रक्रियेची संपूर्ण माहिती देतील.
  • उमेदवार अनेकवेळा अपात्र ठरल्यास Job Showcase शी सलग्न विविध संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. (टीप- प्रशिक्षणादरम्यान कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही | प्रशिक्षण कालावधी ३-४ महिने असेल | Job Showcase शी सलग्न विविध प्रशिक्षण संस्थेविषयी अधिक माहितीसाठी Page No.3 पहा. )
  • वरील संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल तुम्हाला प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी Email मार्फत पाठविला जाईल (अहवालामध्ये असणारी माहिती - उमेदवाराचे नाव | संपर्क क्रमांक | पत्ता | शैक्षणिक पात्रता | कामाचा अनुभव |Job Showcase ने उमेदवारांना संपर्क केलेल्या दिवशीची तारीख, वेळ व संभाषणाचे विश्लेषण )
  • आलेल्या प्रत्येक नवनवीन उमेदवारांची मार्गदर्शन प्रक्रिया वरीलप्रमाणे केली जाईल.
  • एकाच शैक्षणिक पात्रतेचे अनेक उमेदवार असल्यास तुमच्या ऑफिसला विशिष्ट कंपनीच्या थेट मुलाखती आयोजित केल्या जातील.